शिल्लक कापुस यादीसंदर्भात उपजिल्हाधिकारी भारदे यांनी घेतली बैठक

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कापुस विक्रीधारक शेतकऱ्यांचे शिल्लक कापुस यादीही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठवण्यात आली असुन या संदर्भात उपजिल्हाधिकारी रविन्द्र भारदे यांनी नुकतीच एक बैठक घेवुन या संदर्भातील माहीती दिली आहे .

उपजिल्हाधिकारी रविन्द्र भारदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या , जळगाव , भुसावळ , चोपडा , रावेर आणि यावलच्या सचिवांना या संदर्भातील लेखी सुचना पत्र दिले आहे. या पत्रकात नमुद करण्यात आले आहे की, जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे कापुस विक्रीसाठी नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी या कार्यालयात शिल्लक कापसाचे पंचनामे करणेसाठी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने या यादीमध्ये काही शेतकऱ्यांकडे कापुस विक्री करीता शिल्लक नसल्याचे आढळुन आले आहे. अशा शेतकऱ्यांचे नांव ७ / १२नुसार कापुस खरेदी केंद्रात कापसाची खरेदी कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याची दक्षता सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावी अशी सुचना पाठवलेल्या पत्राव्दारे महसुलचे उपजिल्हाधिकारी रविन्द्र भारदे यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असुन अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील साठवुन ठेवलेले कापुस मिळेल त्या वेळेत खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.

Protected Content