जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्हाडदे शिवारातील एका शेतात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्डयावर एमआयडीसी पोलीसांनी धाड टाकून पंचायत समितीच्या आजी-माजी सभापतींना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कुर्हाडदे येथील शेतात जुगार रंगल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र राठोड, प्रकाश पवार, हेमंत पाटील यांच्या पथकाने येथे रविवारी सायंकाळी छापा टाकला. या शेतातून १६ जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. यात पं. स. सभापती नंदलाल पाटील व माजी सभापती धोंडू जगताप यांच्यासह इतरांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ३१ हजार ४०० रुपयांचे जप्त करण्यात आले.
दरम्यान, औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात या प्रकरणी कृष्णा राजु सोनवणे (२२), राहुल राजेंद्र ताडे (२२), भूषण लोटु खलसे (२४), सचिन बाळु बारी (२१), विनोद लक्ष्मण मोरे (२४), सुनील शंकर काटोले (४६), बापु सिताराम महाजन (४२), शिवाजी हरी बारी (४५), मनोज रामकृष्ण बारी (वय ३९), शिवदास उत्तम बारी (३८), नंदलाल शांताराम पाटील (४५), राहुल कृषा बारी (३३), महेश विक्रम महाजन (२४, सर्व रा. इंदिरानगर, शिरसोली), धोंडु शांताराम जगताप (वय ४८, रा. बिलवाडी) व गोरख केदारे (वय ५१, रा. दापोरा) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००