जळगावातील सम्राट कॉलनीचा परिसर सील

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील मृत झालेल्या तरूणाचा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर हा परिसर महापालिका प्रशासनातर्फे रात्रीच सील करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील सम्राट कॉलनीतील रहिवासी असणार्‍या ४० वर्षाच्या तरूणाचा आज दुपारी जिल्हा कोविड रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या आधीच त्याचा स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये हा रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले. यामुळे महापालिका प्रशासनाने रात्रीच हा परिसर सील करण्यास प्रारंभ केला.

महापौर भारतीताई सोनवणे यांनी रात्री तात्काळ परिसराला भेट दिली. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी यावेळी मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांच्याशी चर्चा करीत परिसर सील केला. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना क्वारंटाइन करून परिसरात सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज आहुजा, मुकुंदा सोनवणे, कुंदन काळे, प्रेम बालाणी यांच्यासह नगरसचिव सुनील गोराणे, आरोग्यधिकारी डॉ.विकास पाटील, डॉ.राम रावलानी, डॉ.विजय घोलप, डॉ.संजय पाटील यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content