पारोळा येथून शिक्षकाच्या मोटारसायकलची चोरी

 

पारोळा, प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा क्रमांक १ मधील कविवर्य ना. धों. महानोर प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त शिवरे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक योगेश अशोक पाटील येथे आले होते. त्यांची मोटारसायकल (क्र.एम.एच.१८; ए.इ. ८८१२) ही शाळेच्या पटांगणातून चोरीला गेली आहे.

 

ही घटना शुक्रवारी (दि.१७) रोजी घडली. याबाबत शिक्षक योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बापू पाटील हे करीत आहेत.

Protected Content