हभप प्रा. सुशिल महाराज यांची वारकरी महामंडळाच्या जिल्हा सचिवपदी निवड

 

चोपडा, प्रतिनिधी । अ.भा. वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी देखील जाहीर झाली आहे. अ.भा.वारकरी महामंडळाच्या जळगाव जिल्हा सचिवपदी जळगाव जिल्ह्याचे प्रसिद्ध कथाकार तथा किर्तनकार महंत प्रा.सुशिल महाराज,विटनेरकर यांची निवड करण्यात आली आहे.

कथाकार तथा किर्तनकार महंत प्रा.सुशिल महाराज,विटनेरकर यांची जळगाव जिल्हा सचिवपदी निवड अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज,बोधले यांनी केली आहे. हभप सुशिल महाराज यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक तथा राजकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे. कोषाध्यक्ष हभप भाऊराव महाराज, मुक्ताईनगर,खान्देश विभागीय अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज माळी, नंदुरबार,विभागीय उपाध्यक्ष हभप गजानन महाराज, वरसाडेकर, जिल्हाध्यक्ष हभप भरत महाराज, म्हैसवाडीकर,जिल्हा उपाध्यक्ष हभप मुकेश महाराज, पारगावकर यांनी देखील महाराजांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content