जळगाव जिल्ह्यात १५ कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये १५ कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून यात जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद असेल असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असून रूग्णांची संख्या ५० च्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दररोज रूग्णांच्या संख्येत वाढ होतच चालली आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, पाचोरा आणि अडावद या शहरांमध्ये एकूण १५ कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. यात जळगावमध्ये मारूतीपेठ व समतानगर हे दोन संसर्ग क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तर भुसावळात ५, अमळनेरमध्ये ४, पाचोर्‍यात तीन व अडावदमध्ये एक असे एकूण १५ कंटेन्मेट झोन जाहीर करण्यात आलेले आहेत. यात भुसावळमधील सिंधी कॉलनी, समता नगर, महेश नगर, पंचशील नगर व शांती नगर या पाच भागांचा समावेश आहे.

या झोनमध्ये यापुढे कडकडीत लॉकडाऊनचे पालन करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा यात बंद राहणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content