अडावदकरांनी प्रशासनास सहकार्य करा- प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यापुढे किराणा माल व भाजीपाला घरपोच दिला जाईल असा निर्णय घेत अडावदकरांनी समन्वय राखुन प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आज झालेल्या बैठकीत केले.

आज नूतन ज्ञान मंदिर शाळेच्या प्रांगणात माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, सरपंच भावना माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासुरकर , सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवीत झालेल्या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावाचा संपूर्ण तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून गावातील सर्व घरांचा सर्वे आरोग्य विभागाच्या ५० पथके नेमण्यात आली आहेत. तर गावात संपूर्ण संचारबंदी लागू असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा होऊ नये म्हणून किराणा माल व भाजीपाला घरपोच पाठविण्याची तयारी प्रशासनाची असल्याचे तहसीलदार अनिल गावित यांनी सांगितले.

बाहेरगावाहून येणार्‍यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येईल. घरात जागा नसेल तर शाळेत क्वारंटाईन येईल. अशाही सूचना करण्यात आल्या. ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वार्डात ग्रामस्थांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करावे असे सांगत शेतीच्या काम करण्यासाठी जाणार्‍यांची सोशल डिस्टन्सचे पालन करण्यास सांगावे जेणेकरून कोरोना संसर्गापासून दूर राहता येईल असे सांगत दक्षता बळगण्याच्या सुचना केल्या.

या बैठकिस माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार अनिल गावित,गटविकास अधिकारी बी.एस.कासोदे, सहाय्यक एस.बी.कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर,अडावद प्रा.आ.केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील,प्रशांत पाटील, आरोग्य सेवक सुधिर चौधरी , विजय देशमुख ,तलाठी महेंद्र पाटील, व्ही.डी.पाटील, वडगावचे सरपंच नामदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे , पी.आर.माळी, पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी , ग्रामपंचायत सदस्य हनुमान महाजन, विजय साळुंखे, जावेद खान, आमीनरजा अब्दुल सत्तार , रामकृष्ण महाजन , अनिल देशमुख , सचिन महाजन, जुनेद खान, कालु मिस्तरी, गुलाबराव पाटील, मंगल इंगळे, महेश गायकवाड आदींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन पी.आर.माळी यांनी केले.

Protected Content