रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे रूग्णालयास २० पीपीई किट भेट

चोपडा प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या २० पीपीई किटची भेट शासकीय रूग्णालयास देण्यात आली.

कोरोनाचा विळखा सर्वच देशात अधिक घट्ट होत जातोय. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारी आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या, विविध तंत्रज्ञानयुक्त असलेल्या देशांनीही कोरोनापुढे हात टेकले आहेत. त्यामुळे हा विषाणू किती महाभयंकर असेल याची प्रत्येकाला आतापर्यंत जाणीव झालीच असेल. कोरोना कोणालाही पछाडू शकतो, सामान्य नागरिकापासून ते एखाद्या राजकुमारापर्यंत. विषाणू कोणताही जात-धर्म पाहत नाही, त्यामुळे या विषाणूविरोधात लढायचं असेल तर आपल्यालाही तेवढ्याच वैद्यकीय सक्षमतेने पुढे यायला हवं. लोकांमध्ये हा आजार पसरू नये याकरता जनजागृती सुरू आहे. जे आरोग्य सेवक करोना विरोधात लढतात त्यांच्यासाठी पीपीई किट सुरक्षा कवच आहे

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पीपीई किट हा शब्दप्रयोग नक्की ऐकला असेल, पण तुम्हाला माहितेय का पीपीई किट म्हणजे नक्की काय?

पीपीई किट म्हणजे काय?

पीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा उपकरण. वैयक्तिक सुरक्षा उपकरण (पीपीई) हे असं उपकरण आहे ज्यात एखाद्या संसर्गामुळे होणार्‍या संसर्गापासून संरक्षण मिळते. हे उपकरण आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना दिलं जातं.

काय काय असतं पीपीई किटमध्ये?

हातमोजे, पायमोजे, मास्क, गाऊन, डोक्याचं संरक्षण करण्यासाठी कव्हर, रेस्पिरेटर्स, डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी साधन, फेस शिल्ड आणि गॉगल आदी सर्व वस्तू पीपीई किटमध्ये असतात.

कोणाला दिले जाते हे किट?

पीपीईचा वापर सामान्यत: रुग्णालये, डॉक्टरांच्या कार्यालये आणि क्लिनिकल लॅबसारख्या आरोग्य सेवांच्या संस्थांमध्ये केला जातो. त्वचा, तोंड, नाक, डोळ्यांतून होमार्‍या संसर्गातून वैद्यकीय सेवकांचे संरक्षण होण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.

रुग्णांनाही दिले जाते हे किट?

कोरोनासारखा विषाणू तात्काळ एखाद्या शरीरात संसर्जित होत असतो. त्यामुळे हे किट अशा रुग्णांना दिले जाते. रोटरी क्लब ऑफ चोपडा ने आपली सामाजिक बांधिलकी जपत आज २० पी.पी.ई.किट चोपडा सिव्हील हॉस्पिटल चे डॉ मनोज पाटील यांचा सुपूर्द केले ,सदर प्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडा चे अध्यक्ष रोटे नितीन जैन, सेक्रेटरी रोटे धीरज अग्रवाल , सह प्रांतपाल रोटे व्ही एस पाटील, माजी सह प्रांतपाल रोटे एम डब्लू पाटील, रोटे नितीन अहिरराव ,रोटे डॉ पवन पाटील, रोटे रुपेश पाटील,रोटे प्रफुल गुजराथी,सागर बडगुजर
सह रोटरी सदस्य सोशल डिसटेंसींग चे पालन करत हजर होते.

Protected Content