क्राईम, चोपडा

कमांडर गाडीतुन प्रवासी पडून ठार: चालकविरोधात गुन्हा

शेअर करा !

वाचन वेळ : 1 मिनिट

IMG 20190314 WA0014

चोपडा (प्रतिनिधी)। तालुक्यातील वैजापूर येथील तेल्या घाट खाली कमांडर गाडीत बसलेला प्रवासी चालकाचा हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या वळणावर फेकला गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना १२ रोजी घडली असून चालक विरुद्ध चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैजापूर येथील तेल्या घाटखाली खाजगी प्रवासी वाहतूक करणारी कमांडर गाडी क्र. एम.एच.१५ के ३००८ ही भरधाव वेगाने चालवीत रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून ड्रायव्हर संतोष शंकर पाटील याने वळणावर आपल्या ताब्यातील वाहन वेग कमी न करता चालविले म्हणून गाडीत बसलेला प्रवासी पिंटू चिंतामण भोई (३८) रा.सानेगुरुजी वसाहत हा फेकला गेल्याने जागीच ठार झाला.सुनिल सीताराम भोई यांच्या फिर्यादीवरून दि.१४ रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात भाग ५ गु.र.न.१७ भा. द.वि.कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.का.भरत रामजी नाईक हे करीत आहेत.

आपल्याला हे देखील आवडू शकते !


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*