मेहू ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भगवा !

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मेहू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदासाठी ७ जागेची काल माघारीची अंतिम प्रक्रिया पार पडली. यात गावातील सलोख्याचा व विकासाचा दृष्टीकोनातून लोकनियुक्त सरपंचपदासह ७ ग्रामपंचायत सदस्य आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील संमतीने जाहीर देण्यात आला.

यात काल माघारीच्या कालावधीत संगनमत न झाल्याने आज आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतर उमेदरावांनी जाहीर पाठींबा लेखी स्वरुपात देत निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत माघार घेणाऱ्या उमेदवार वारांनी पत्रक देखील काढले आहे. यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवार जिजाबाई पाटील यांना मनिषा पाटील, सुनंदा पाटील, सीमा विकास पाटील यांनी एकमताने जाहीर पाठींबा दिला. तर प्रमिला मधुकर पाटील, कमल पाटील, अनिल पाटील, बारकू पाटील, मनिषा पाटील, भगवान पाटील, सीमा पाटील यांना देविदास पाटील, राजनंदिनी पाटील, रविंद्र पाटील, सुरेश पाटील, भारती हाटकर, सीमा पाटील, पूनम बोरसे व जिजाबाई पाटील यांनी सदस्य पदासाठी जाहीर पाठींबा दर्शविला.

मेहू ग्रामपंचायतीवर आता जवळ जवळ बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याने या ग्रामपंचायतीवर आता बाळासाहेबांचा शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले असून आमदार चिमणराव पाटील यांनी लोकनियुक्त सरपंचासह बिनविरोध सदस्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात गावातील मुलभूत सुविधेसह इतर विकासकामांचा लवकरच टप्प्या टप्प्याने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देखील यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी नवनियुक्त शिष्टमंडळास दिले.

यावेळी मा.पंचायत समिती सदस्य भिडूभाऊ जाधव, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, मेहू लोकनियुक्त सरपंच विकास जगन्नाथ बोरसे, मुंदाणे प्र.ऊ.मा.सरपंच एकनाथ पाटील, आडगांव पोलीस पाटील मनोहर मोरे, गणेश मोरे, मंगरूळ येथील भटू बन्सीलाल पाटील, मेहू येथील हिम्मत सुपडू पाटील, राजेंद्र लोटन पाटील, आनंदा पुंडलिक पाटील, जगदीश हरी पाटील, टिटवी येथील मदन महादू पाटील, चीखलोड येथील भूषण मधुकर पाटील, राजेंद्र सुरेश हाटकर, गणेश सुपडू पाटील, सुधाकर यशवंत पाटील, मांगो पुंडलिक हाटकर, मुमुराबाद येथील विनोद मधुकर पाटील, अजबराव रामचंद्र पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

Protected Content