उद्या कंकणाकृती खंडग्रास सुर्यग्रहण: खगोलप्रेमींना उत्सुकता ..!

जळगाव प्रतिनिधी । कंकणाकृती खंडग्रास सूर्यग्रहण हे उद्या दिवसाच्या प्रहरात असणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतभर दिसणार आहे. त्यामुळे हे ग्रहण पाहण्याची उत्सुकता अभ्यासक आणि खगोल शास्त्रज्ञाना लागली आहे. अभ्यासकांना निसर्ग अविष्काराचे अद्भुत निरीक्षण करता येणार आहे.

हे ग्रहण मृगशिरा, आद्रा नक्षत्र आणि मिथुन राशीत लागणार आहे. सुर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे.उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यदर्शन दिसेल. ग्रहणाची वेळ सकाळी ९ वाजून १५ मिनिट आहे तर कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरुवात सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी होईल. स्पर्श १०:०८, मध्य ११:४९, मोक्ष १३:४०, पर्व ०३:३२ असे असेल. ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशियाखंड, आफ्रिकाखंड, दक्षिण युरोपचा काही भाग आणि ऑस्टेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशांमध्ये ग्रहण दिसणार आहे.

पुण्यकाल – ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल हा पुण्यकाल मानवा.

ग्रहणाचा वेध – हे ग्रहण दिवसाच्या दुस-या प्रहरात असल्याने शनिवारी २० जुनच्या रात्री १०:०० पासून २१ जुनच्या दिवशी ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी दि.२१ जून च्या पहाटे ४:४५ पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत असे कळविण्यात आले आहे. वेधामध्ये भोजन करु नये. स्नान, जप, नित्यकर्म, देवपुजा, श्राद्ध ही कर्मे करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमुत्रोत्सर्ग, झोप इ. कर्मे करता येतात. ग्रहणपर्व कालात मात्र ( सकाळी १०:०८ ते १३:४०) पाणी पिणे, मलमुत्रोत्सर्ग आणि झोपणे ही कर्मे करु नयेत.

ग्रहणातील कृत्ये – ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपुजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पुर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, खाणे-पिणे व कामविषयसेवन ही कर्मे करु नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धि असते.

ग्रहणाचे राशिपरत्वे फल – मेष, सिंह, कन्या, मकर या राशींना शुभ फल, वृषभ, तुला, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन या राशींना अनिष्टफल आहे. ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.

मंत्र-तंत्र पुरश्चरणासंबंधी – नवीन मंत्र घेण्यास व गृहित मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकालामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.
स्नानासंबंधी – ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे. तरीही उष्णोदकाहून शीतोदक, पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नानाउत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.

Protected Content