धरणगाव येथे कोरोनामुक्त रूग्णांचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत (व्हिडीओ)

धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील १५ कोरोना रुग्ण बरे होऊन आज त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचे जिल्हाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील गुलाबपुष्प, पेढा, मास्क, सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले.

कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात असतांना त्यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील , शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना गटनेते पप्पू भावे, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन, विजय महाजन, पारेराव बापू, अजय चव्हाण, राष्ट्रीय चर्मकार कार्याध्यक्ष भानुदास विसावे, मोती आप्पा पाटील, मोहन महाजन, रवी कंखरे, वाल्मीक पाटील, तोसिफ पटेल, अमोल चौधरी, छोटू जाधव, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी, किरण अग्निहोत्री व सर्व शिवसेना नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना निगेटिव्ह रुग्णांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व प्रशासनाचे आभार मानले. धरणगाव येथे एकूण १०३ पॉझिटिव्ह , ६५ उपचार यशस्वी होऊन घरी , ८ मयत , ३० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या ३० पैकी १५ धरणगाव, ४ औरंगाबाद, १ नाशिक आणि १० जळगाव येथे उपचार घेत आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=982932362161840

Protected Content