तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने तरूण जखमी; चौघांवर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सोनवद फाट्याजवळील अंजनी गार्डन हॉटेल येथे धक्का लागल्याच्या कारणावरून एका तरूणाला चार जणांनी तिक्ष्ण हत्याराने वारून करून गंभीर जखमी केल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता घडली होती. याप्रकरणी गुरूवार २८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप सुभाष नन्नवरे वय ३६ रा. सोनवद ता. धरणगव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंडप व टेन्ट हाऊस दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. संदीप नन्नवरे हा सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता मित्रांसोबत गावातील अंजनी गार्डन हॉटेल येथे जेवनासाठी गेला होता. त्यावेळी हॉटेलात बसलेला रावसाहेब कैलास सपकाळे रा. निमखेडा ता. धरणगाव याने संदीपला हाताने धक्का दिली. त्यावेळी संदीपने म्हणाला की भाऊ सावकाश जा असे बोलल्याचा रागा आल्याने रावसाहेब कैलास सपकाळे यांच्यासह त्याचे मित्र सुभाष धनसिंग सपकाळे, मोहित रविंद्र कोळी, मयुर ईश्वर सपकाळे सर्व रा. निमखेडा यांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसचे तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर जखमी संदीप नन्नवरे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर गुरूवारी २८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता संदीप नन्नवरे याने दिलेल्या फिर्यादीवरून रावसाहेब कैलास सपकाळे, सुभाष धनसिंग सपकाळे, मोहित रविंद्र कोळी, मयुर ईश्वर सपकाळे सर्व रा. निमखेडा ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे हे करीत आहे.

Protected Content