योगेश्वर नगरातून एकाची दुचाकी लांबवली; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील योगेश्वरनगर येथे घरासमोरून बांधकाम सुपरवायझरची दुचाकी लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, योगेश्वर नगरात गणपती मंदिराजवळ भाडेकरारावरील खोलीत संदीप सुरेश वाणी हे पत्नी व दोन मुली या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संदीप वाणी यांनी ४ मे रोजी रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी एमएच १९ सीडी  ३७६७ ही घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी सकाळी ८.३० वाजता उठल्यावर घरासमोर त्यांची दुचाकी दिसून आले नाही. सर्वत्र परिसरात तसेच बस स्थानक, शहर पोलिस ठाणे, रामानंदनगर एमआयडीसी पोलिस स्टेशन याठिकाणी दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकीबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. संदीप वाणी यांनी याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस नाईक अमोल विसपुते हे करीत आहेत.

Protected Content