फैजपूर येथे पिक विमा योजनेच्या जाचक अटीविरोधात निवेदन

WhatsApp Image 2020 01 20 at 6.05.52 PM

फैजपूर, प्रतिनिधी | प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुमारे साडेतीनशे कोटी रक्कम जमा केली असून ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अचानक प्रशासनाने नियमात बदल करुन नविन परिपत्रक जारी केले व शेतकऱ्यांवर जाचक अटी लादून विमा कंपन्यांचा लाभ व्हावा म्हणून जून्या अटी रद्द करण्यात आल्या असा थेट आरोप खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केला.

शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री मिळत असलेला विजपुरवठा हा रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंतच मिळत असल्याने पुर्ण वेळ पिकाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही. पुरुष शेतकरी ओढाताण करून रात्री शेतात जाऊन पिकाला पाणी देऊ शकतात पण ज्या महिला शेतकरी आहेत त्यांनी रात्री शेतात जाऊन पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. तसेच दिवसा मोठ्या प्रमाणावर वीजेची समस्या निर्माण होतात व त्यामुळे पिकाला वेळेवर पाणी देण्यास अडचणी निर्माण होतात. म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी शक्यतो पुर्णवेळ दिवसा वीजपुरवठा केला जावा तसेच रात्रीची वेळ वाढवून सकाळी ११ वाजेपर्यंत करण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेत जळगाव जिल्ह्यातील काही मोजक्या गावांचा समावेश करण्यात आला असून तसे न करता जळगाव जिल्ह्यातील सरसकट सर्व गावांचा या योजनेत समावेश करावा अशी मागणी न्हावी येथील धनेश्वर भोळे, नितीन चौधरी सरपंच, मिलिंद महाजन भारत विद्यालय,इत्यादिंनी केली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या मागील अटिंनुसार विमा हप्ता वसुली करुन अचानकपणे राज्यात कोणतेही सरकार अस्तीत्वात नसतांना ३१ आक्टोबर २०१९ रोजी प्रशासनाने बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय एक्सा, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी नियमांत बदल केले असून ते त्वरीत रद्द करावे अशी मागणी मानवाधिकार फोरम जिल्हाध्यक्ष संदीप धर्मराज पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान येत्या आठवडाभरात जाचक अटी रद्द करुन शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्यास रास्ता रोको किंवा उपोषण सारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला. खान्देश नारीशक्ती गृप, यावल रावेर परीसरातील सर्व शेतकरी बांधव, न्हावी येथील विविध पदाधिकारी, शेतकरी तसेच मानवाधिकार फोरम जिल्हाध्यक्ष यांच्यातर्फे संयुक्तपणे फैजपूर येथील उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी धनेश्वर भोळे, नितीन चौधरी, पंकज बोरोले, कमलाकर चौधरी, तुळशीराम फिरके, संजय भंगाळे, शशिकांत तळेले, राहूल चौधरी,सागर फीरके,करणसिंग बारेला, मिलिंद महाजन, तुकाराम बोरोले, नरेंद्र नारखेडे, सुभाष बोरोले, निलेश चौधरी,मोहन चौधरी,पराग वाघुळदे, निलेश चौधरी,उमेश बेंडाळे,धीरज पाटील, अविनाश फिरके, देवेंद्र चौधरी, किशोर वाघुळदे,धीरज चौधरी,किरण चौधरी,ललित बढे, चंचल चौधरी, देवेंद्र झोपे, एहसान कुरेशी,सौ.लता नारखेडे,सौ.रुपाली चौधरी,सौ.रजनी चौधरी,शशिकला चौधरी,सौ.उषा पाटील,सौ.प्रतिभा नेमाडे यांच्यासह यावल रावेर,न्हावी, फैजपूर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Protected Content