यावल मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण व मतदार नोंदणी कार्यक्रम घोषित

यावल प्रतिनिधी । यावल येथे आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

 

यावल येथे आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे . आयोगाचे आदेशान्वये १ नोव्हेंबर २०२१- एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी असेल तर १३ नोव्हेंबर ( शनिवार), १४ नोव्हेंबर (रविवार) आणि २७ नोव्हेंबर (शनिवार),२८ नोव्हेंबर (रविवार ) या दिवशी विशेष मोहीम राबवण्यात येईल. २० डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार असून दि. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर ते ३० जानेवारी या दरम्यान १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे किंवा अधिक असे उमेदवार आपले नाव यादीत समाविष्ट करु शकता त्यासाठी नमूना क्रमांक ६- मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना ७ ,–मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना क्रमांक ८ — मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना क्रमांक ८अ मतदार यादीतील नोंदीच्या स्थानांतर करण्यासाठी करावयाचा अर्ज या मतदार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे ही कामे करता येतील. तेव्हा लोकशाहीच्या बळकट करणासाठी पात्र नागरीकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे असे आवाहन येथील महसुल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content