पवारांनी ‘त्या’ अधिकार्‍यांवर विश्‍वास कसा ठेवला ? : राऊतांचा सवाल

मुंबई प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे अधिकारी हे पवारांच्याही नजरेत आले असतांना ‘त्या’ अधिकार्‍यांवर त्यांनी विश्‍वास कसा ठेवला ? असा प्रश्‍न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

सध्या रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या टॅपींगचे प्रकरण गाजत आहे. यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही 6 महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी दोन अधिकाऱ्यांना सुटीवर पाठविण्यास सांगितले होते, असेही राऊत म्हणाले. वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊतांनी सांगितले.

Protected Content