जळगाव, प्रतिनिधी | ‘उडी उडी जाय, पतंग तेरी उडी उडी जाय’ म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत गीत व संगीताच्या तालावर ठेका ‘उडाण’ संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तसेच जळगावकर नागरिकांनी युवाशक्ती फौंडेशन आयोजित पतंगोत्सवात जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील मैदानावर ठेका धरला.
मकरसंक्रांती सणानिमित्ताने युवाशक्ती फौंडेशन, जी.एच.रायसोनी महाविद्यालय आणि उडाण संस्थेच्या वतीने पतंगोत्सव मंगळवारी घेण्यात आला. यावेळी रायसोनी इन्स्टीट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, उडाण संस्थेच्या संचालिका हर्षाली चौधरी, मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा, युवाशक्तीचे सचिव अमित जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पतंग महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, पतंगोत्सवात दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष आहे. उडाण फाउंडेशनमधील दिव्यांग मुलांनी तयार केलेले पतंग यावेळी उपस्थितांना मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी उडाण संस्थेच्या ६८ विद्यार्थ्यांनी मनसोक्त पतंग उडवत विविध गीतांवर नृत्य करून आनंद लुटला. त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते. याप्रसंगी सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत उत्साह दाखविला. या ठिकाणी तिळगुळही एकमेकांना वाटप करण्यात आले. प्रा. राज कांकरिया, प्रा मकरंद वाठ, प्रकाश शर्मा, युवाशक्ती फौंडेशनचे सदस्य उमाकांत जाधव, प्रशांत वाणी, सागर सोनवणे, विनोद सैनी, सौरभ कुळकर्णी, नवल गोपाळ, राहुल चव्हाण, मयूर जाधव, पियुष हसवाल, मनजित जांगीड, आकाश धनगर यांचेसह आयएमए संस्थेचे सदस्य उपस्थित होते.