अखिल भारतीय मारवाडी महिला अधिवेशन ; जळगाव शाखा महाराष्ट्रात अव्वल

WhatsApp Image 2020 01 14 at 5.07.32 PM

जळगाव, प्रतिनिधी | अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच अकोला येथे घेण्यात आले. या अधिवेशनात राज्यभरातून प्रथम येत जळगाव शाखेला एकूण १२ पुरस्कार मिळाले. या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांकडून जळगाव शाखेचे कौतुक करण्यात येत आहे.

अकोल्यातील एका सभागृहात झालेल्या ‘मयूर कुंभ’ हे १० वे अधिवेशन भरले होते. यावेळी गत दोन वर्षातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील महिला मंडळांचे व पदाधिकाऱ्यांचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. त्यात जळगाव शाखेच्या अध्यक्षा अंशू रामप्रकाश अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट, नवीन शाखा उघडल्याबद्दल, प्रादेशिक बैठकीत कुशल नियोजन केल्याबद्दल देखील जळगाव शाखेचा गौरव करण्यात आला. तसेच नेत्रदान, देहदान, अवयवदान, बाल विकास प्रकल्प, पर्यावरण संरक्षण, स्वास्थ सेवा प्रकल्प आदी स्तुत्य अभियान राबविल्याबद्दल देखील विशेष पुरस्कारांनी जळगाव शाखेला गौरविण्यात आले. ‘नये गाने, पुराना डान्स’ या थीमवर घेण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत जळगाव शाखेला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यात नीतू सोनी, पूनम वर्मा, दीप्ती अग्रवाल, रोशनी अग्रवाल, सुधा खटोड, पुष्पा वर्मा, अल्पना शर्मा, मोहिनी शर्मा यांनी भाग घेतला होता. विविध विषयांवर काढण्यात आलेल्या रॅलीत उत्कृष्ट सहभागाबद्दल तसेच बंगाली थीम नाटिका प्रकारातही प्रथम पुरस्कार अंशू रामप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील जळगाव शाखेला मिळाला आहे. यासाठी सरोजिनी कासट, निधी भट्टर, ललिता अग्रवाल, सुषमा बाहेती, सुरेखा कोठारी, संतोष नवाल, उषा सिखवाल, गायत्री शर्मा, माया केजरीवाल, प्रवीणा मुंदडा, सुनिता दमाणी, कीर्ती अग्रवाल, पूजा अग्रवाल, पूजा दायमा, मनीषा दायमा, सुशीला राठी, दीपा टिब्रेवाल आदींनी सहभाग घेत अधिवेशनात मिळालेल्या पारितोषिकांचा राष्ट्रीय अध्यक्ष उषा टिब्रेवाल, राज्याध्यक्षा पद्मा गोयंका यांच्या हस्ते स्वीकार केला.

Protected Content