नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय “सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट” वर्कशॉप

भुसावळ प्रतिनिधी । येथील कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय आज (दि.२०) रोजी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल अँड कम्युनिकेशन स्किल कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाइन “नॅशनल लेवल सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप” चे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. व्ही. वायकोळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. उद्घाटक म्हणून मॅनेजमेंट गुरु प्रकाश शेष, नागपूर हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील,  डॉ. बी. एच्. बऱ्हाटे, डॉ. एन. ई. भंगाळे, डॉ ए. डी. गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन संपन्न झाल्यानंतर अध्यक्ष प्राचार्य डॉ. सौ. एम. व्ही. वायकोळे यांनी उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप केला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, व्यक्तिमत्त्व विकासासाठी Soft Skills  विकसित करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल करू शकतो. 

उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रथम सत्रात प्रकाश शेष यांनी “Thinking Out Of The Box” या विषयावर मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सांगितले की, आपल्या विचारांची बंदिस्त चौकट तोडून आपले अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी, सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच त्यांनी विविध उदाहरणातून, घटनांच्या माध्यमातून  आपले अनुभव कथन करून लोकांना वास्तववादी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रामध्ये श्री अमेय अग्रवाल, मॅनेजमेंट गुरु, पुणे, यांनी “Leadership and Entrepreneurial  Attitude – The Winning Way of Life” या विषयावर आपले विचार मांडले त्यात त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व आपले मनोबल वाढविण्यासाठी प्रात्यक्षिका व्दारे अनुभूती करून दिली. शेवटच्या सत्रामध्ये डॉ. संजय अरोरा, नागपूर यांनी  “The Art and Science of Marketing Yourself – Personal Branding ” यावर भाष्य केले त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की, प्रत्येक क्षेत्रात मार्केटिंग महत्वपूर्ण आहे. तसेच आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्केटिंगचा एक भाग म्हणजे ब्रॅण्डिंग असतो. त्यामुळे वस्तूची एक वेगळी ओळख निर्माण होऊन तिची विक्री मोठ्या प्रमाणात होतो व कंपनीचा नफा वाढण्यास मदत होते, म्हणून प्रत्येकाने आपला स्वतःचा एक ब्रँड तयार करावा असे, आवाहन त्यांनी केले.

त्यानंतर राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. डॉ. नरेंद्र कुमार दासरे, नवी मुंबई व उत्कर्ष भंडारी, जळगाव या सहभागी सभासदांनी मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यशाळेसाठी संपूर्ण भारत भरातून एकूण 360 सभासदांनी नोंदणी केली. त्यामध्ये महाराष्ट्राबाहेरील कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ, गुजरात, वेस्ट बंगाल, हरियाणा, ओडिसा, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान व तामिळनाडू इत्यादी राज्यातून एकूण 63 सभासद सहभागी होते.  ZOOM APP व यूट्यूब लिंक https://www.youtube.com/watch?v=ySgdQor03YQ वर कार्यशाळेचा लाभ घेतला.

कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा. आशिष नवघरे, प्रास्ताविक प्रा. डॉ. रश्मी शर्मा, परिचय प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी करून दिला तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा डॉ. जी. आर. वाणी, प्रा. व्ही. ए. सोळुंके, डॉ. एम. जे. जाधव, प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. डॉ. पी. ए. अहिरे, प्रा. व्ही. पी. लढे, प्रा.  डॉ. आर. एस. नाडेकर आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content