इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे वाजंत्रीच्या गजरात पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध झाडे लावण्यात आली.

यात आंबा, चिंच, वड, निंब व पिंपड ही झाडे लावण्यात आली. स्कुलच्या परीसरात मोठ्या प्रमाणावर मोठ मोठी वृक्ष असून दरवर्षी होत असलेल्या वृक्षारोपणाने शाळेच्या परीसराचे सौंदर्ये हे अधीकच वाढत आहे. विशेष म्हणजे स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व सचिव मनिष विजयकुमार पाटील हे वृक्षप्रेमी असल्याने प्राचार्य अशोक पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचेही त्यांना सहकार्य मिळते.

वृक्षारोपणा प्रसंगी हर्षल मोरे, योगीता बिहारी, दिलीप संगेले, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, राजश्री अहिरराव, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, दिनकर पाटील, नेहा धांडे, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक तायडे, पुजा शिरोडे, तुषार धांडे, बाळासाहेब पाटील इ.सह विद्यार्थी उपस्थीत होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!