आ.शिरीष चौधरींच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना सायकल वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज यावल येथील शेतकरी संघाच्या सभागृहात यावल परिसरातील दिव्यांग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी जिल्हा परिषद माजी गटनेते  प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, यावल शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, कृउबाचे माजी सभापती नितिन चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सकलेन शेख, नईम शेख, हाजी गफ्फार शाह, अजय बढे, पुंडलीक बारी, विक्की गजरे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक अस्लम शेख, समिर मोमिन, सैय्यद युनुस, मनोहर सोनवणे, राष्ट्रवादीचे नाना बोदडे, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .

आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवानेते धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना काहीतरी मदत करावी, या उद्देशाने संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाना  स्व:खर्चाने 30 सायकल वाटप करण्यात आल्यात. यात यावल शहरात 7 दिव्यांग बांधवाना सुद्धा आज सायकल वाटप करण्यात आले. यात गोपाल काकडे, मरेखा इसाखा, आशा कोळी, बाळू वाणी, कय्युम खान नूर, शाहीनबीन सय्यद अलाउद्दीन या दिव्यांग बांधवांचा समावेश आहे.

 

Protected Content