Home क्राईम पत्रकार संरक्षण कायद्यानुसार खामगावात पहिला गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार खामगावात पहिला गुन्हा दाखल

0
101


press logo

बुलडाणा, प्रतिनिधी | वृत्तसंकलनासाठी गेलेल्या ‘सांज दैनिक लोकोपचार’चे पत्रकार शिवाजी भोसले यांना मारहाण केल्याप्रकरणी येथील ग्रामीण पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद केली आहे. फटाका व्यवसायिक सुनील अग्रवाल सह तिघांनी मारहाण केल्याची तक्रार पत्रकार भोसले यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती.

 

दरम्यान पत्रकार भोसले यांना मारहाणीचा जिल्हाभरात सर्वच पत्रकार संघटनेने निषेध करीत उपरोक्त तिघा आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्याकडे केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव प्रदीप पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound