हिवरखेडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

download 1

जामनेर, प्रतिनिधी | शहरात रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली असून हिवरखेडा रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. या वाढत्या वर्दळीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून हिवरखेडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

शहरात रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला असून हिवरखेडा रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा रस्ता मोठ्या प्रमाणात लहान मूल, महिला नागरिकांचा वापर असून याच रस्त्यावरून ट्रॅक्टर, डंपर,व मोटरसायकलची सुद्धा वापर वाढला आहे. मुख्य रस्त्याला कॉलन्यांमधील रस्ते जोडल्यामुळे मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन जात असतात. त्यामुळे अनेक अपघात झाले असून खबरदारी म्हणून या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. यावेळी घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सी.यु.पाटील यांना बोलवुन रस्त्याची परिस्थिती लक्षात आणुन देण्यात आली. साने गुरूजी कॉलनीजवळ चौफुलीवर तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अॅड.भरत पवार, सखाराम महाराज, भगवान खोडपे, भागवत चौधरी, श्रीराम चौधरी व नागरीक उपस्थित होते.

Protected Content