जात पडताळणीसाठी मुदतवाढ : कोळी महासंघातर्फे गिरीशभाऊंचे आभार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकप्रतिनिधींना जात पडताळणीसाठी एक वर्षांची मुदतवाढ मिळवून दिल्यानिमित्त कोळी महासंघाने ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जिल्ह्यातील कोळी समाजाच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडुन आलेल्या कोळी समाजाच्या काही नागरिकांना जात पळताळणी प्रमाणपत्र वेळेवर देत नसल्याने जिल्हाभरातील काही लोकांना अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु ही अडचण लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचाशी चर्चा करून शासनाद्वारे या लोकांना एक वर्षाची मुदत वाढवुन दिली.

या अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन यांचे कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हरलाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली जामनेर,चोपडा,रावेर,मुक्ताईनगर,भुसावळ, यावल,बोदवड,तालुक्यातील एका शिष्ठमंडळाने आभार मानले आभार आहेत. तसेच यावेळी कोळी समाजाला अनुसूचीत जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर कराव्यात व समस्या त्वरित सोडविण्यासाठी सुलभेतेने मिळावे आपण प्रयत्न करावे असे साकडे घालण्यात आले.

दरम्यान, राज्याच्या विविध जिल्ह्यात अर्ज केल्यावर प्रमाण पत्र दिले जाते त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाला जाचक अटी न लावता प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की मुख्या मंत्रांशी चर्चा करून तुमचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे सांगण्यात आले.

याप्रसंगी चंद्रकांत कोळी, रवी कोळी, सोपान कोळी,जामनेरचे टायगर अप्पा, संतोष कोळी, विनोद कोळी, यावलचे सागर कोळी, नितिन सपकाळे, सुजित कोळी, बंडू कोळी, सोपान कोळी, विनायक कोळी, शरद कोळी, सदाशिव कोळी, राजु कोळी, सुधीर तायडे,सुनिल सपकाळ, सावन कोळी,आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content