Home Cities जळगाव मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर


voting 2
 

जळगाव  (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवार, 21 ऑक्टोबर, 2019 रोजी जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.

 

या दिवशी शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळ, मंडळ, केंद्र सरकारची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुटी लागू राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound