त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी सकाळी फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदे, ता. जामनेर येथे कोंब नदीनाल्या काठी तसेच जलकी धरण परिसरात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी एकूण चार गुन्हे दाखल केले. घटनास्थळावरून १ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले, तसेच ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.

या कारवाईत जाबीर हसन तडवी (वय ३८), फकीरा रमेश तडवी (वय ३७), हजराबाई युनूस तडवी (वय ३४) आणि रहमान कासम तडवी (वय ७२, सर्व रा. गोंदे, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम तसेच पाचोरा विभागाच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.
जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.



