Home Uncategorized ६.३ मीटरची झेप घेत अथर्व निळेची राज्यस्तरावर भरारी; जे. टी. महाजन स्कूलचा...

६.३ मीटरची झेप घेत अथर्व निळेची राज्यस्तरावर भरारी; जे. टी. महाजन स्कूलचा गौरव!

0
13

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जे. टी. महाजन स्कूलचा विद्यार्थी अथर्व दिनकर निळे याने नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेत लांब उडी या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत ६.३ मीटरची झेप घेतली. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अथर्वच्या या यशामुळे शाळेसह फैजपूर परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या नाशिक विभागीय स्पर्धेत अथर्वने आपल्या कौशल्याचे आणि मेहनतीचे प्रभावी प्रदर्शन केले. लांब उडीमध्ये ६.३ मीटर अंतर पार करत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान निश्चित केले. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे.

अथर्वच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन, उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, सेक्रेटरी विजय रघुनाथ झोपे आणि मानद सहसचिव शशिकांत रामचंद्र चौधरी यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पुनम नेहते, क्रीडा शिक्षक दिलीप संगेले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथर्वचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अथर्वने मिळवलेले यश हे त्याच्या कठोर परिश्रमासोबतच शाळेतील क्रीडाप्रेमी वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सरावाचे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही अथर्वने अशीच दमदार कामगिरी करून जे. टी. महाजन स्कूलचे आणि फैजपूरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound