Home प्रशासन भडगावात एस.आय.आर. जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम

भडगावात एस.आय.आर. जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम

0
5

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) तर्फे एस.आय.आर. (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात नागरिकांना मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रद्धा राजेंद्र यांनी एस.आय.आर. प्रक्रियेचे महत्त्व, मतदार यादी अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अब्दुल करीम सालार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. वक्त्यांनी मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनाबाबत जनजागृती करण्याबरोबरच लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले. तसेच युवकांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदाऱ्यांचेही प्रामाणिकपणे पालन करण्याची गरज व्यक्त केली. बैठकीदरम्यान उपस्थितांनी विविध सामाजिक विषयांवर आपली मते मांडली. समाजात बंधुता, शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.


Protected Content

Play sound