Home Cities मुक्ताईनगर आ. एकनाथराव खडसे मातोश्रीवर : उध्दव ठाकरे यांची घेतली भेट !

आ. एकनाथराव खडसे मातोश्रीवर : उध्दव ठाकरे यांची घेतली भेट !

0
30

मुक्ताईनगर-पंकज कपले । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना-उबाठा पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आमदार एकनाथराव खडसे हे लवकरच नवीन राजकीय निर्णय घेणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे महासचिव तथा खासदार विनोद तावडे यांनी त्यांची भेट घेतली होती. यामुळे चर्चा सुरू झाली असतांनाच आज त्यांनी पुन्हा एका नवीन नेत्याची भेट घेतली आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांनी आज थेट मातोश्री गाठली. येथे त्यांनी शिवसेना-उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्या पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने आ. एकनाथराव खडसे यांच्यशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तथापि, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी खडसे यांचे समर्थक डॉ. अभिषेक ठाकूर यांची देखील उपस्थिती होती.


Protected Content

Play sound