Home उद्योग जिल्ह्यासाठी प्रथमच 10:26:26 खताचा रेल्वे रॅक दाखल ; माफदाचे विनोद तराळ यांच्याहस्ते...

जिल्ह्यासाठी प्रथमच 10:26:26 खताचा रेल्वे रॅक दाखल ; माफदाचे विनोद तराळ यांच्याहस्ते पूजन

0
4


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, इंडो-रामा कंपनीकडून जिल्ह्यासाठी प्रथमच 10:26:26 या रासायनिक खताचा विशेष रेल्वे रॅक जळगाव रेल्वे मालधक्का येथे दाखल झाला. या रेल्वे रॅकचे माफदाचे विनोद तराळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे या खताचा रेल्वे रॅक उपलब्ध झाल्याने खत पुरवठा अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव रेल्वे मालधक्का येथे झालेल्या या कार्यक्रमाला इंडो-रामा कंपनीचे जिल्हाभरातील वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये त्याचे जलद वितरण करणे शक्य होणार आहे. यामुळे खताच्या उपलब्धतेबाबत निर्माण होणारी अनिश्चितता कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. खरीप हंगामात पिकांच्या वाढीसाठी संतुलित अन्नद्रव्यांची आवश्यकता लक्षात घेता 10:26:26 हे खत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते. पेरणीनंतर योग्य वेळी खत उपलब्ध होणे हे उत्पादनवाढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याने या रेल्वे रॅकमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. इंडो-रामा कंपनीने जळगाव जिल्ह्यासाठी प्रथमच हा विशेष रेल्वे रॅक उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच आगामी काळातही शेतकऱ्यांना दर्जेदार खताचा वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


Protected Content

Play sound