
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोचुर खुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दलित वस्तीत मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य या भागातील प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.




