पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी आपल्या चुलत भावासोबत १९ एप्रिल असताना रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास फिरोज नुरमोहम्मद शहा (वय २६, रा. पाचोरा) याने तिला गाठले. संशयित आरोपी पीडितेच्या अंगावर हात टाकून तिला अश्लील स्पर्श केला आणि तिची लज्जास्पद छेड काढली. पीडितेसोबत असलेल्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तात्काळ पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गंगे हे करीत आहे.




