Home क्राईम किरकोळ कारणावरून डोक्यात टाकले किलोचे लोखंडी माप

किरकोळ कारणावरून डोक्यात टाकले किलोचे लोखंडी माप


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील कासमवाडी परिसरामध्ये आमच्या दुकानावर येणारे ग्राहक तुम्ही वळविल्याचे म्हणत नवीद अकिल खाटीक यांच्या डोक्यात एक किलोचे माप शेजारील दुकानदाराने मारल्याची घटना शनिवारी १० मे रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवीद खाटीक यांचे कासमवाडी परिसरात दुकान आहे. त्यांच्या शेजारील दुकानदार त्यांच्याकडे आला व तुम्ही आमचे ग्राहक तुमच्याकडे वळविले आहे. तुम्हाला जास्त झाली आहे, असे म्हणत एक किलो वजनाचे माप डोक्यात मारले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच तेथे आणखी एक जण आला व त्याने नवीद व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली.
या प्रकरणी खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.


Protected Content

Play sound