अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 महिन्यात या एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल दिला जाणार आहे. 23 सप्टेंबर दिवशी अक्षयचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला तो बदलापूरच्या आदर्श विद्यामंदीर मधील दोन शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या संदर्भात घडलेल्या घटनांचा क्रम, ज्यामुळे आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि त्याची कारणे आणि परिणाम शोधले जाणार आहेत.

या घटनेसाठी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा संस्था, जर असेल तर, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार धरण्यात आली आहे का? परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का? अशा प्रश्नाची उत्तरे शोधली जाणार आहेत. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयानेही उपस्थित सवाल उपस्थित केले होते.

Protected Content