मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जलजीवन मिशन अंतर्गत चांगदेव येथे १ कोटी ७० लाखाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. चांगदेव महाराज मंदिराकडे गावापासून दोन किमी अंतरावर स्मशान भूमीजवळ या योजनेसाठी विहीर बांधली असून ती एका महिन्यातच खचली. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेच्या अन्य कामांतही शंका व्यक्त होत आहे. चांगदेव हे गाव ५ हजार वस्तीचे असून या गावासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. यासाठी १ कोटी ७० लाखाची ही योजना असून
गावापासून चांगदेव महाराज मंदिराकडे २ किमी अंतरावर विहिरीचे बांधकामही झाले. मेन पाइपलाइन टाकली आहे. इस्टिमेटप्रमाणे खोदकाम करुन पाइपलाइन टाकली नसल्याची चर्चा सुरुच आहे, असे असतानाच ३५ फूट खोल बांधलेली विहीर खचली. या विहिरीचे काम तातडीने पूर्ण करुन ही योजना कार्यान्वित करावी. अशी ग्रामस्थांमधून होत आहे. शासनाच्या निधीतून गावातील मुलभूत समस्या सुटणार असल्याने योजना नागरिकांसाठी महत्वाची आहेत, परंतु त्याचे कामच निकृष्ठ होणार असेल तर योजनाच न आणलेली बरे अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
१ कोटी ७० लाखाची ही योजना असून या योजनेंतर्गत ३ किमी मेन पाइपलाईन, सब लाईन, २५ हजार व २० हजार लिटरचे दोन जलकुंभ, १० व १५ हॉर्स पावरच्या २ मोटारी, गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटारीचे बांधकाम, रिपेरिंग करून देणे अशा कामांचा यात समावेश आह