मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील केळीची बाग कापण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून एका महिलेला बांबूच्या काठीने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका शिवारात पिडीत महिला आपल्या शिवारातील शेतात सोमवारी २० एप्रिल रोजी शेतात काम करत होत्या. त्यावेळी संशयित आरोपी प्रभाकर धोंडू महाजन हा तेथील केळीची बाग कापत होता. त्यावेळी पिडीत महिलेने “केळीची बाग का कापतोस?” असा जाब विचारला असता, त्याचा राग अनावर झाला. त्यानंतर महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण हे करीत आहे.




