Home क्राईम सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

0
177

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद परिसरातील मन्यारखेडा येथून एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, अज्ञात आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मन्यारखेडा परिसरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपासून घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. दरम्यान तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound