सम्राट कॉलनीतील तरूणाची दुचाकीची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सम्राट कॉलनीत राहणाऱ्या तरूणाची दुचाकी एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंग येथून २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशीरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भिमराव सुकलाल बारी (वय-३३) रा. सम्राट कॉलनी, लक्ष्मी नगर हे सुप्रिम कंपनीत कामाला आहे. कामावर जाण्यासाठी (एमएच १९ एएस ३५६६) क्रमांकाची दुचाकी आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता दुचाकीने गाडेगाव कंपनीत कामाला गेले. सायंकाळी ४.३० वाजता कंपनीतून जळगाव येथे येत असतांना त्यांना रस्त्यावरील हॉटेल सुमेरसिंग येथे जेवणासाठी गेले. त्यावेळी त्यांनी हॉटेल समोर दुचाकी पार्कींग करून लावली होती. जेवण करून दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. भिमराव बारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चेतन सोनवणे करीत आहे. 

Protected Content