मिठाईच्या दुकानाची खिडकी तोडून चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पोलीनपेठ येथील कोंबडी बाजार येथील मिठाईच्या दुकानाची खिडकी तोडून लॅपटॉप व रोख ५०० रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. ही घटना शनिवारी २ सप्टेंबर रोजी समोर आली आहे.  या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  शरीफ गमीर पिंजारी (५२, रा. जोशीपेठ) यांचे कोंबडी बाजार परिसरात मिठाईचे दुकान आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री ते दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाची खिडकी तोडून आत प्रवेश केला. तेथे असलेला लॅपटॉप व रोख ५०० रुपये चोरट्याने चोरुन नेला. शनिवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ४ वाजून १० मिनीटांनी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. एकूण पाच हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला. या प्रकरणी पिंजारी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहेत.

Protected Content