अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील सुकदेव नथ्थु सोनवणे यांचा मालकीचे स्वस्त धान्य दुकानास ISO नामांकन मिळाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी अमळनेर महादेवजी खेडकर, तहसीलदार रुपेशकुमारजी सुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. सुनिलजी नंदवाळक,पुरवठा तपासणी अधिकारी मा. संतोषजी बावणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
विशेषतः म्हणजे तालुक्यातुन फक्त पाचच दुकानांना हे मानांकन देण्यात आले आहे. त्यापैकी पाडळसरे येथील स्वस्त धान्य दुकानाचा समावेश आहे. सुखदेव कोळी गेल्या 25 ते 26 वर्षांपासून याठिकाणी धान्य वितरीत करीत असून आजतागायत त्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची तक्ररीची नोंद नाही.याचे कारण आलेले धान्य वेळेवर वाटप करणे,लाभार्थी यांच्याशी समान वागणूक व सर्व्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त धान्य दुकानात टापटीप व स्वछता टिकवून ठेवणे.या सर्व गोष्टी वेळोवेळी अधिकारी यांचा तपासणीत योग्यरित्या आढळून आल्या होत्या.याचीच दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाडळसरे येथील सुखदेव सोनवणे यांचा स्वस्त धान्य दुकानास ISO मांनाकन देऊन त्यांना गौरविण्यात आले. प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान सुखदेव सोनवणे यांचे तालुका व परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.