जनआंदोलन समितिचे पाडळसरे धरणावर कलश पूजन

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरणाच्या मुख्य कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करुण धरणाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी शिवजयंतीला साखळी उपोषण जनांदोलन समिती करणार आहे.त्याची मुख्य सुरुवात 15 रोजी सकाळी नऊ वाजेला प्रत्यक्ष धरणस्थळी येऊन तापीचे पाणी घेऊन ग्रामपंचायत सदस्या सविता पाटील भूषण पाटील यांच्या हस्ते कलश पूजन होणार आहे. दरम्यान,अमळनेर तालुक्यातील 156 गावातून तापीच्या पाण्याने भरलेला कलश फिरवून जनजागृती समिती करणार आहे.

 

तापी नदीवरील पाडळसरे धरणाचे बंद असलेल्या कामापासुन ग्रामपंचायत सदस्या सविता पाटील भूषण पाटील  जनांदोलन समितीचे पदाधिकारी व येथील ग्रामस्थ यांनी कलश पूजन केले. यानंतर पाडळसरे  येथील गावातून या कलश रथाचे आगमन होताच गावात सर्वत्र या रथाचे स्वागत करीत आरतीही यावेळी करण्यात आल्या. पाडळसरे धरण अमळनेर येथील बहुचर्चित, लोकप्रतिनिधीनी दुर्लक्षित केलेले जनतेचा जिव्हाळ्याचा आणि उपजीविकेचा प्रलंबित प्रश्न म्हणून पाडळसरेधरण पूर्णत्वास नेण्यासाठी पाडळसरे धरण समितीने शिवजयंती पासून उपोषणाचा इशारा दिला आहे.अमळनेर तालुका सातत्याने दुष्काळ ग्रस्त असून पुढे शेतीलाच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. ता.5 एप्रिल 2018 मध्ये पाच तालुक्यातील जनता,विविध सामाजिक संघटनानी मोर्चा काढला होता. भाजपचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी लाईव्ह भाषणाद्वारे आश्वासनांचा पाऊस पाडला होता. स्थानिक लोकप्रतिनिधीनी देखील या संदर्भात विशेष प्रयन्त केले नाहीत. या पार्श्वभूमीवर 6 ऑगस्ट रोजी भीक मांगो आंदोलनही समितीने केले होते. परंतू धरणाचे काम पुढे सरकले नाही .समिती च्या सदस्यांनी जलसंपदा मंत्री यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता 2300 कोटी नाबार्ड मार्फत उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. या व अशाच भूलथापा मंत्री महोदयानि समितीला वारंवार दिल्या.त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधीना देखील वारंवार निवेदने,भेट घेवून सदर विषय लावून ठेवला आहे.

तालुक्यातील शेतकरी व सामान्य माणसाच्या हिता साठी धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे यासाठीशिवजयंती पासून समितीचे सदस्य आणि सामान्य जनतेने उपोषणाचा इशारा दिला आहे.याबाबतीत तातडीने निर्णय न झाल्यास ठिकठिकाणी विविध आंदोलने केले जातील असाही इशारा दिला आहे.अशी माहिती सुभाष चौधरी, शिवाजी पाटील, विवेक देसले, एस एम पाटील, योगेश पाटील,  सुनील पाटील, प्रशांत भदाने , डि एम पाटील,देविदास पाटील आदी समितीचे प्रतिनिधी यांनी यावेळी  दिली . याप्रसंगी  पाडळसरे धरणावर कलश पूजन प्रसंगी विकास सोसायटिचे संचालक  सचिन पाटील,भूषण पाटील, वसंतराव पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील,अभिमन कोळी,गोपाल कोळी, विकास पाटील,रामसिंग कोळी,पद्माकर कोळी,आत्माराम कोळी,सोपान कोळी,सुरेश कोळी,भरत कोळी,न्यानेश्वर कोळी,भुला कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Add Comment

Protected Content