म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मोफत हृदय रोग तपासणी शिबिर

amalner23

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील गोडाऊन कट्टा, ढेकू रोड या ग्रुपतर्फे राष्ट्रपीता जोतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी ढेकू रोड परिसरातील गोडाऊन कट्टा ग्रुपच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारे समाजिक स्तुत्य उपक्रम राबविले जात असतात.

 

यावर्षी देखील 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुठलाही डिजे किंवा बँन्ड वर व इतर वायफळ खर्च न करता समाजोपयोगी कार्यक्रम म्हणजे ह्रदयरोग तपासणी शिबीर अमळनेरला ढेकूसिम रोडवर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे पिंपळे रोड व ढेकूरोड परिसरातील नागरिकांना मोफत हृदयरोग तपासणी करण्याचे आवाहन गोडाऊन कट्टा ग्रुप व भारत मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आले होते. या शिबिरात ढेकूरोड व पिंपळेरोड परिसरातून शेकडो नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी अनेकांच्या मोफत ह्रदयरोग तपासण्या झाल्या. मधुमेह, हृदयरोग, ई.सी.जी.टेस्ट पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे डॉ.भुषण मगर(पाटील) व डॉ. पियुष अग्रवाल यांनी केल्या. यावेळी परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी या शिबिरात विविध तपासण्या करून घेतल्या. हे शिबिर आयोजित करणाऱ्या गोडाऊन कट्टा ग्रुप टीम आणि भारत मुक्ती मोर्चा यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

Add Comment

Protected Content