एसटी कर्मचाऱ्यांची संयुक्त कृती समिती मार्फत तपासणी ; चार कर्मचारी पॉझिटीव्ह

 

 

जळगाव, प्रतिनिधी   । येथील  बस स्थानकात विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांना संयुक्त कृती समिती मार्फत मार्गदर्शन करून कडक सूचना देण्यात आल्या. समितीतर्फे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली असता ४ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह   आढळून आले.

बस स्थानकात विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांना  मार्गदर्शन प्रसंगी जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी प्रवीण कुमावत, गोपाळ पाटील, भालचंद्र हटकर, निंबा महाजन, विनोद पाटील, राजेंद्र पाटील यांनी प्रत्येक बसमध्ये चढून प्रवाशांना मास्क लावण्याचे तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले.  महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक बस मध्ये प्रवाशांना उभे राहण्यास मनाई करण्यात आलेली आहे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. ज्या प्रवाशांकडे मास्क आढळून आला नाही अशा प्रवाशांना मास्कचे वितरण करण्यात आले. 

प्रशासनाकडून ३१०  कर्मचार्‍यांची तपासणी

जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी  शनिवारी  करण्यात आली.  तपासणी कार्यक्रमाला सुरुवात विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या हस्ते करण्यात आली. जळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली.  एकूण तीनशे दहा कर्मचाऱ्यांच्या तपासणीअंती चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव असलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी स्थानक प्रमुख मनोज तिवारी, वाहतूक नियंत्रक शिरीष चौधरी यांनी वैद्यकीय अधिकारी यांचे आभार मानले.

 

Protected Content