Home Cities जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पोलीस अधिक्षक डॉ.मुंढे यांच्याहस्ते माल्यार्पण (व्हिडीओ)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पोलीस अधिक्षक डॉ.मुंढे यांच्याहस्ते माल्यार्पण (व्हिडीओ)

0
55


जळगाव प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेल्वेस्थानक समोरील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले. 

पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी केलेल्या अभिवादानंतर सर्व भिम सैनिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी बोलताना प्रवीण मुंडे म्हणाले की, कोरोनाच्या आपत्ती काळात काळात भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीम जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. यासंदर्भात आपण सर्व अनुयायांचे आभार व्यक्त करत आहोत. आपत्तीच्या काळात कोणताही गाजावाजा न करता विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी पोलीस अधिक्षक यांनी जनतेला केले आहे. कोरोनाच्या काळात स्वत:सह आपल्या कुटुंबियांची काळजी घेत विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये असे आवाहन देखील डॉ. मुंढे यांनी केले आहे. 

https://www.facebook.com/508992935887325/videos/288849419317845

 


Protected Content

Play sound