Home आरोग्य बहिणाबाई कोविड केअर सेंटरला बंटी राणे व मित्र परिवारातर्फे धान्य व किराणा

बहिणाबाई कोविड केअर सेंटरला बंटी राणे व मित्र परिवारातर्फे धान्य व किराणा

0
55

 

जळगाव, प्रतिनिधी । लेवा पाटीदार सोशल आणि स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला बंटी राणे (कुसुंबा) यांच्या मित्रपरिवारातर्फे धान्य (किराणा) भेट देण्यात आले.

बहिणाबाई कोविड केअर सेंटरला धान्य व किरणा वाटपप्रसंगी मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, चंदन कोल्हे, बंटी राणे, सुशिल पाटील, संदीप पाटील, प्रमोद पाटील, बंटी खडके, प्रमोद पाटील,अर्जुन भोळे, राजेश नारखेडे,किरण वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. बहिणाबाई कोविड केअर सेंटर शासकीय तंत्र निकेतन , जळगाव येथे विनामूल्य सुरू करण्यात आले आहे. अनेक रुग्ण उपचार घेत आहेत , असे जनसंपर्क व प्रसिद्धी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound