प्रति पंढरपूर पिंपळगाव (हरेश्वर) येथे यात्रा उत्साहात संपन्न; पाऊसातही घेतले भाविकांनी दर्शन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोऱ्यापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेलं पिंपळगाव (हरेश्वर) हे गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या यात्रेत विविध दुकाने व संसार उपयोगी वस्तूची दुकाने थाटण्यात आली होती. आज सकाळपासून पाऊसातही भाविकांची प्रमाणात गर्दी उसळली होती. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे गोविंद महाराज यांनी जिवंत समाधी घेतली आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे गावाच्या पूर्वेस बहुळा नदीच्या काठावर विठ्ठलाचे भक्त गोविंद महाराजाची समाधी आहे. आणि दरवर्षी आषाढी एकादशीस याठिकाणी पंचक्रोषीसह जळगाव जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भक्तांची मांदियाळी यात्रेच्या निमित्ताने फुलेली असते. या महतीमुळे या ठिकाणाला महत्व आले असून त्यामुळेच प्रति पंढरपूर असा उल्लेख गावाचा होतो.

एकादशीनिमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, वीज मंडळ, वैद्यकीय अधिकारी, तसेच पोलीस आणि होमगार्ड, कार्यरत होते. तसेच अनेक समाजिक संस्था भाविकांसाठी मोफत चहा फराळ वाटप करण्यात आले पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या वतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता.

नाशिक येथील पाटील इलेक्ट्रिकल्सतर्फे २२ वर्षांपासून निःशुल्क मंदिराची रोषणाई पाचोरा तालुक्यातील परधाडे येथील मुळचे रहिवाशी व सद्यस्थितीत नाशिक येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले पाटील इलेक्ट्रीकल्सचे संचालक मनोज पाटील व अतुल पाटील हे येथील श्री. गोविंद महाराज मंदिर परिसरात यात्रेच्या चार दिवस आधी व यात्रा संपन्न झाल्यानंतर दोन दिवस लाईटींग व इलेक्ट्रीकची साधने उपलब्ध करुन देतात. परधाडे येथील नव युवक मित्र मंडळ व नाशिक येथील मित्र मंडळींतर्फे गेल्या १३ वर्षांपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केळी वाटप करतात. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Protected Content