Home Cities अमळनेर संसर्ग कायम, मात्र बरे होणारेही वाढले; आज ११९० बाधीत तर ११४२ झालेत...

संसर्ग कायम, मात्र बरे होणारेही वाढले; आज ११९० बाधीत तर ११४२ झालेत बरे !

0
87

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून गत चोवीस तासांमध्ये ११९० रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असली तरी याच कालावधीत ११४२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. अर्थात, बरे होणार्‍यांची संख्या देखील वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.

गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ११९० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत १०४२ पेशंट बरे झाले आहेत. तर आज जिल्ह्यात १५ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. अर्थात, रूग्ण देखील मोठ्या संख्येत बरे होत असले तरी मृत्यूंचे प्रमाण कमी होत नसल्याची बाब चिंताजनक अशी आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर-२९९; जळगाव ग्रामीण-१३; भुसावळ-९४; अमळनेर-१००; चोपडा-१६८; पाचोरा-३७; भडगाव-३१; धरणगाव-४३; यावल-३२; एरंडोल-१२; जामनेर-४१; रावेर-६८; पारोळा-६५; चाळीसगाव-६७; मुक्ताईनगर-७६; बोदवड-४१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.


Protected Content

Play sound