महात्मा फुले व सावित्रीमाईमुळेच महीला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर : मयुरी माळी

mayuri mali

अमळनेर (प्रतिनिधी) बहुजन समाजासाठी व दलितांसाठी प्रचंड कार्य करणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले हेच खरे दैवत आहेत .छत्रपती शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून शिवजयंती उत्सव समिती स्थापन करणारे व जगाच्या पाठीवर सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची जयंती सार्वजनिकरीत्या सुरू करणारे महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांवर पोवाडा रचून शिवरायांचे गुणगान गायले. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली, असे प्रतिपादन मयुरी दिनेश माळी यांनी केले. त्या साईबाबा सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

 

श्री.साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,वाघ बिल्डिंग जवळ, साई धाम मंदिर, अमळनेर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मयुरी दिनेश माळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर मालपुरे होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा मयुरी माळी यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मयुरी माळी यांनी दिली. कार्यक्रमाला उपस्थितांनी प्रतिमा पुजन करुन महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याचा बद्दल मनोगत व्यक्त केले. त्यात प्रामुख्याने सुनील वाणी,अनिल महाजन,जमुनादास भाऊ ठाकूर ,जितेंद्र महाजन ,मिलिंद वाणी ,गिरीश महाजन अशोक सिंधी,चिंतामण वाणी, सागर महाजन, मनोहर मराठे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे ग्रंथपाल व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन जितेंद्र महाजन यांनी केले. यावेळी माळी समाजातील मान्यवर महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Add Comment

Protected Content