पाळधीतील जिल्हा परिषद शाळेत मंत्री महाजनांच्या हस्ते वृक्षारोपण

पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन दानशूर दात्याकडून तसेच ग्रामपंचायतच्या पुढाकाराने शाळेचा कायापालट होत आहे. लवकरच शाळेची वाटचाल मॉडेल स्कूलकडे होणार आहे. भव्य वृक्षारोपणासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करून त्यांच्या सहकार्यातून रस्त्याच्या दुतर्फा नारळाचे वृक्ष लावण्यात आली.

वृक्षारोपण ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांच्या शुभहस्ते तसेच सरपंच प्रशांत बाविस्कर, माजी सभापती नीता पाटील, माजी सरपंच कमलाकर पाटील माजी जि. प. सदस्य कैलास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे, शिव सन्मान प्रतिष्ठान संस्थापक विश्वजीत पाटील, सोपान सोनवणे मनोज नेवे, दीपक माळी, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. योगेश माळी, डॉ. सचिन पाटील, एस. एम. पाटील, उखर्डु बावस्कर, आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आपण ज्या शाळेत शिकलो मोठे झालो. ज्या शाळेमुळे जीवनाचा विकास झाला. त्या शाळेला सुंदर करायचा असा निर्धार गावचे सरपंच प्रशांत बाविस्कर व माजी सरपंच कमलाकर पाटील व शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी केला आहे. यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, व शिक्षिका,यांनी मेहनत घेतली

Protected Content